हेल्दी टिप्स
टिप्स
* दही , नाचणी , खारीक , खजूर यात भरपूर केल्शियम असते.
* कात , गुलकंद , सुपारी यात न्युट्रिशनल फेक्ट आहेत.
* जुनं खाणं फ्रिजमध्ये ठेऊन खाल्याने किंवा पदार्थ फ्रिजमध्ये जूने
होईपर्यंत ठेवल्याने त्यातील अनावश्यक केलरीज वाढतात.
* तिळ आणि गुळ हे पदार्थ सांध्यांच्या लुब्रिकेशनसाठी उपयुक्त आहेत.
* डाळ , दूध या पदार्थांमधून प्रोटीन्स मिळतात.
* नुसते सलाड खाण्यापेक्षा रोजच्या आहारात कोशिंबिरीचा वापर करा.
* जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्या वेळेचे पालन करा.
* दिवसभर काही खायचं नाही आणि रात्री एकदा खायला बसलं की थांबायचं
नाही असे केल्याने वजन वाढते.
* व्यायाम केवळ जाड झाल्यावर करू नये तर रोज थोडा व्यायाम शरीराला आवश्यक असतो.
* आपली दिनचर्या आपण ठरवली पाहिजे. एकच एक ठराविक आदर्श दिनचर्या अशी सांगता येत नाही. ती प्रत्येकाने आपली आपण ठरवायची असते.
*
पोट जड होईपर्यंत जेवण्यापेक्षा दर दोन-तीन तासांनी थोडं थोडं खावं.
प्रत्येक भोजन हलके असावे. आत्ता मला किती खावसं वाटतंय हे आधी स्वतःला
विचारा आणि तेवढेच खा. खाण्याचा अतिरेक टाळावा कारण प्रत्येक दिवशीची भूक ही वेगळी असते.
* तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल अशी तुमची
भोजनाची पद्धत निश्चित करा.
* व्यायामाचा अतिरेक केल्याने वजन वाढू शकते.
No comments:
Post a Comment