सांगा कसे झुंजलात 'ब्रेस्ट कॅन्सर'शी!
जगात दर तीन मिनिटाला एका स्त्रीच्या स्तनाच्या कॅन्सरचे म्हणजे ' ब्रेस्ट कॅन्सर ' चे निदान नोंदवले जाते. पण योग्य काळजी घेतल्यास उपचारांनी या कॅन्सरवर मात करणा-यांची संख्याही मोठी आहे. तुमच्या मित्रमंडळींमध्ये , कुटुंबात असे कोणी आहे का ? किंवा कदाचित तुम्हीच ही झुंज दिली असेल. तुमच्या या लढ्याची गोष्ट आम्हाला सांगा.
' आय दिवा ' ( iDiva.com) या टाइम्स ग्रूपच्या महिलांसाठी असलेल्या विशेष वेबसाइटने स्तनांच्या कर्करोग जागृतीचा संकल्प सोडला आहे. त्यासाठीच ' द हिरोज प्रोजेक्ट ' हा आगळावेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याद्वारे या कॅन्सरशी झुंजणा-यांच्या प्रेरणाकथा संकलित करण्यात येणार आहेत.
तुम्ही पाठवलेल्या या प्रेरणाकथा तज्ज्ञ परिक्षक वाचून पाहतील. त्यातील
अभिमानास्पद अशा निवडक पाच कथांना विविध बक्षिसांनी गौरविण्यात येईल. तसेच
या कथा इंटरनेटवर विशेष विभागात प्रसिद्ध करण्यात येतील.
आम्हाला ठावूक आहे की ,
ब्रेस्ट कॅन्सरशी केलेली ही झुंज नक्कीच सोपी नसणार. केस गळण्यापासून
शरीरातील वेदनादायक बदलांशी लढणे शब्दात मांडणे तेवढेच कस पाहणारे असेल. पण
तुमच्या अनुभवातून इतर लढवय्यांना आधार मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा
अनुभव शब्दात उतरवण्यासाठी प्रयत्न कराच...
No comments:
Post a Comment