गोष्ट वजनाची
गोष्ट वजनाची
कालच झालेल्या ओबेसिटी दिनानिमित्त ,
हा अतिस्थूलपणा कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बॅरिअॅट्रिक
सर्जरीबद्दल...बॅरिअॅट्रिक सर्जरीमध्ये जठराचा आकार कमी करून ओबेसिटी कमी
करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रक्रियेत सगळ्यात महत्वाची भूमिका
गॅस्ट्रोइंटेस्टिन वरील दोन प्रक्रियांची आहे. यामध्ये जठराचा आकार कमी
केल्यामुळे थोड्याच प्रमाणात अन्न खाल्लं तरी पोट भरल्यासारखे वाटतं आणि
दुसरा म्हणजे लहान आतड्यांची लांबी कमी केल्यामुळे अन्नातील कमी कॅलरी
शरीरात शोषून घेतल्या जातात.
कुणासाठी ?
अनेक उपाययोजनानंतरही ज्यांचं वजन कमी होत नसेल त्यांना या सर्जरीची गरज
भासते. एखादी व्यक्ती अनेक वर्षांपासून क्रॉनिक ओबेसिटीने ग्रस्त असेल तर
तो या सर्जरीसाठी योग्य ठरेल.
फायदे
रुग्णाचं वजन झपाट्याने कमी होऊ लागतं. १८ ते २४ महिन्यांपर्यंत वजन कमी होण्याची प्रक्रिया सुरु राहाते.
झोपेत श्वास घेताना होणारा त्रास , मधुमेह , उच्च रक्तदाब आणि उच्च कोलॅस्ट्रोलपासून मुक्तता मिळते.
सकारात्मक बदलही आढळून येतो.
महिलांमध्ये मासिक पाळी वेळेवर येऊ लागते आणि मुले होण्याची शक्यताही वाढते.
पुरुषांचे लैंगिक आयुष्य सुखी समाधानी होते.
खर्च
पाश्चिमात्य देशांमध्ये हा खर्च १७ हजार ते ३० हजार अमेरिकन डॉलर्स इतका
येतो. मात्र भारतात अमेरिकन खर्चाच्या फक्त एक चतुर्थांश रकमेत ही सर्जरी
होते. खर्चाच्या रकमेत विमानातून उतरल्यापासूनच्या खर्चाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment