‘कुरकूरीत खाऊ, पोटात बाऊ
कुरकुरित आणि चटपटीत खाऊ
खाणा-या मुलांना सावधानतेचा इशारा देण्यासारखा प्रकार सध्या शहरात काही
ठिकाणी घडत आहे. पाच रुपयांना मिळणा-या चकाचक पॅकेटमधील कुरकूरीत पदार्थ
खाल्यामुळे लहान मुलांना पोटाचे विकार जडत असल्याचे समोर आले आहे. शहरातील
काही भागात अशा घटना वारंवार घडत असल्याने पालकांनी मुलांना कुरकूरीत खाऊ
पोटात बाऊ अशी भीती घालण्यास सुरवात केली आहे.
लहान मुलांना
आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी पॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणात चटपटीत पदार्थ
विक्रीसाठी मिळतात. अंगठीच्या आकाराच्या गोल रंगीबेरंगी चकत्या असणारा एक
पदार्थ सध्या लहान मुलांच्या आवडीचा बनला आहे. या पाच रुपयांना मिळणाऱ्या
पॅकेटबरोबरची लहान मोटार गिफ्ट मिळते. त्याच्या गिफ्टच्या आकर्षणामुळे या
पदार्थाच्या पाच-सहा पिशव्या मुले सहज फस्त करतात. पालकही मुलांच्या
हट्टापायी असे पदार्थ खरेदी करण्यासाठी पैसे देतात. मात्र , भेंडे गल्ली ,
बाराइमाम तालिम परिसरात काही मुलांच्या पोटात सतत दुखत होते. स्कॅनिंगनंतर
त्यांच्या आतड्याला सुज आल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. काहीजणांना
अल्सरसदृश्य झाल्याचेही निदान झाल्यावर पालकांचे डोळे उघडले. पोटाचे विकार
हे सबंधित पदार्थामुळे झाल्याचे उपचारावेळी डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात
आले.
दिल्लीस्थीत कंपनीचे प्रोडक्ट असणाऱ्या या लाल-पिवळ्या
तळलेल्या चकत्या आंबटगोड फ्लेवरमध्ये असल्याने खायला मस्त वाटतात. त्यामुळे
मुले या पदार्थाच्या आहारी जात आहेत. दुसरीकडे जी उत्पादने जास्त खपतात ,
अशा कंपन्यांची बनावट उत्पादने बाजारात खुलेआम येत असल्याने एकूणच
पदार्थांच्या भेसळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कुठल्या पदार्थांमध्ये कोणती
भेसळ आहे हे अन्न व ओषध प्रशासनाने डोळे उघडून कारवाई केली तरच स्पष्ट
होणार आहे.
'
माझ्या पाच वर्षाच्या मुलाच्या पोटात सतत दुखत होते. आम्ही उपचार करुनही
त्याची पोटदुखी कमी होत नव्हती. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या
पोटाचे स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये त्याच्या आतड्याला सुज आल्याचे दिसले.
डॉक्टरांनी त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल विचारल्यावर कुरकुरीत
पदार्थ हे पोटदुखीचे कारण समोर आले. आमच्या आसपास अनेक मुलांची ही समस्या
आहे ' असे चप्पललाइन येथील अमजद फरास यांनी सांगितले.
पालक ' खाऊ ' बाबत काटेकोर हवेत
डॉ. दिपक पाटील (पोटविकार तज्ञ)
मुलांच्या खाद्यपदार्थांहबाबत पालक खूप काटेकोर असायला हवेत. आपण काय खातो ?
या प्रश्नाशी पोटाचे विकार सबंधित आहेत. लहान मुलांच्या खाऊकडे पालकांनी
काटेकोरपणे पाहावे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे पोटाचे विकार अलीकडे वाढले
आहेत. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
No comments:
Post a Comment