Sunday, 2 December 2012

तुम्ही किती तंदुरुस्त आहात?

 तुम्ही किती तंदुरुस्त आहात?

health

आजारी पडत नाही म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं आहे का ? शांत-निवांत आयुष्य म्हणजे बैठं काम आणि उत्साही जीवन म्हणजे धकाधकीचं रुटीन असा तुमचा समज असेल तर तो काढून टाका. निरोगीपणाच्या व्याख्या वेगळ्याच आहेत.

तुम्ही स्थूल आहात का ?
तुम्ही तीन जिने न थकता आणि धाप न लागता चढू शकता का ?
तुमच्या झोपेचं प्रमाण योग्य आहे ?
दैनंदिन कामातून आराम करण्यासाठी तुम्ही वेळ काढता ?
वरच्या प्रश्नांची उत्तर जर नाही असतील तर तुमच्या रुटीन मध्ये थोडेफार बदल करून तुमच्यात सुधारणा घडवून आणू शकता.
तुमचं ध्येय गाठण्यासाठी स्मार्ट पद्धतीचा वापर करा. ( S M A R T )

' एस ' हे अक्षर आहे स्पेसिफिक (ठराविक) या अर्थाने :
तुम्ही ठरवलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करा. त्यासाठी कामाची यादी करा. उदा. सकाळी फिरायला जाणं , पौष्टिक नाश्ता करणं.

' एम ' आहे मेजरेबल (मोजून मापून) साठी :
एखादा संकल्प सोडला की त्याचं अवलंबन होतंय की नाही हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी तुमच्या रोजच्या प्रगतीची नोंद ठेवली पाहिजे. पूर्वीपेक्षा अधिक वेळ चालण्याची तुमची क्षमता आहे का ? तुम्हाला अधिक चांगली झोप लागते का ? तुम्ही पुरेसं पाणी पिताय का ? अशा गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे.

' ' आहे अॅक्शन (कृती) साठी :
फक्त विचार करू नका तर कृती करा! एकदा ठरवलं की त्या दिशेने कामाला लागा. तरच यश मिळेल. उदा. लिफ्टच्या ऐवजी जिन्याचा वापर करा , घरातली कामं उत्साहाने करा.

' आर ' हे अक्षर आहे , रिअलिस्टीक (सत्यता):
एका दिवसात जग जिंकायचा विचार काढून टाका. त्यापेक्षा स्वतःमधल्या छोट्याछोट्या बदलांना महत्व द्या.

' टी ' आहे टाईम ( वेळ ) या अर्थाने :
वेळेचं भान नेहमीच असू द्या. वेळेचं बंधन नसेल तर तुम्ही निश्चित केलेलं ध्येय विसरून जाल. आपल्यात होत असणारी प्रगती लक्षात घ्यायची असेल तर वेळेची मर्यादा ही असायलाच हवी.

No comments:

Post a Comment