Saturday, 8 December 2012

‘नुपुर’चा कोडग्रस्तांना आधार


‘नुपुर’चा कोडग्रस्तांना आधार

कोड (पांढरे डाग) असणा-या मुलीला पत्नी म्हणून स्विकारताना अनेक अडचणी येतात. स्वत.ला नाही पण बहिणीला या परिस्थितीतून होरपळल्यानंतर अशा मुलीचे लग्न जुळताना काय दिव्यातून सामोरं जावे लागते हे नुपुर काळे यांनी जाणले.... यानंतर हताश न होता समाजातल्या अशा मुला-मुलींच्या पाठीशी राहण्याचे आव्हान नुपुर यांनी स्विकारले. रंगद्रव्य कमी झालेल्या अशा मुला-मुलींना जीवनाचा साथीदार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आजही अशा परिस्थितीतून झुंझणाऱ्या मुलींना त्यांनी मायेचा हात पुढे केला आहे.

शरीरावर असणारे पांढरे डांगे संसर्गजन्य नाही किंवा यामुळे रोज औषधे घ्यावी लागत नाही. मात्र तरी याकडे गांभर्याने पाहिले जात नाही. पांढरे डाग किंवा कोड हा समाजाच्या दृष्टीने दोष , पण वैद्यकीय दृष्ट्या आजार नाही. समाजात मात्र पांढरे डाग असणा-यांच्या वाट्याला येते ती अवहेलना... खरे तर पांढरे डाग किंवा कोड असणे ही आपल्या शरीरातील रंगद्रव्यपेशींची कमतरता असते. मेलॅनिन हे रंगद्रव्य तयार करणाऱ्या मेलॅनोसाईट या पेशी हळूहळू नाहीशा झाल्यामुळे पेशींचा रंग हळूहळू पांढरा होत जातो. यामुळे व्यक्तीच्या कोणत्याही क्षमतेत घट होत नाही. फक्त बाह्यरूप बदलते आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनच उध्वस्त करते. अशा व्यक्तींना मानसिक धक्क्यातून बाहेर काढून आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी व कोड असणाऱ्या व्यक्तींना २००७ पासून नुपुर काळे समुपदेशन करत आहेत.

तसं पाहिलं तर कोड हा काही आजार नाही. कारण त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही किंवा जीवालाही धोका होत नाही. तरीसुध्दा कोड हा एक भयंकर असा ' सामाजिक आजार ' आहे. कोड असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे किती अवघड असते हे त्या कुटुंबालाच माहित असते. याचा विचार करत काळे गेल्या पाच वर्षांपासून अशा व्यक्तींना आधार देणे , समाजात जनजागृती करणे , लोकांच्या मनातील गैरसमज दूर करणे आणि अशा मुलांचे विवाह जुळविण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. शरीरावर पांढरे डाग असणाऱ्या अशा परिस्थितीत जाणाऱ्या मुलांना आधार देऊन त्यांचे आयुष्य उभं करण्याचा काळे यांचा प्रयत्न हा समाजासाठी एक आदर्श आहे.



 

No comments:

Post a Comment